छत्रपती संभाजीनगर : शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्त्वाच्या जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी शनिवारी १४ तासांचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कामामुळे सिडको-हडको परिसराचा पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहणार असून, नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या वेळापत्रकात एका दिवसाची अतिरिक्त वाढ होणार आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने टाकण्यात आलेल्या १५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून एन-५ येथील जलकुंभ भरण्यासाठी जोडणीचे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) मार्फत नियुक्त कंत्राटदार हे काम हाती घेणार असून, त्यासाठी सिडको-हडको भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या १११८ मिमी व्यासाच्या एक्स्प्रेस जलवाहिनीवर शटडाऊन घेण्यात येईल.

एमजेपीने या कामासाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्याकडे १४ तासांच्या शटडाऊनची मागणी केली होती. कामाची आवश्यकता लक्षात घेऊन आयुक्तांनी त्यास मंजुरी दिली आहे. या कालावधीत जय विश्वभारती कॉलनी व गारखेडा जलटाक्यांसाठी आवश्यक जोडणीची कामे पूर्ण केली जाणार आहेत.

पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वसंत भोये यांनी सांगितले की, जलवाहिनी रिकामी करणे, जोडणीची कामे पूर्ण करणे आणि त्यानंतर पुन्हा जलवाहिनी भरणे यासाठी अतिरिक्त ५ ते ६ तास लागणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/I6kWaCT1EMB7py0eVHlGdl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

670 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क