छत्रपती संभाजीनगर : सायबर फसवणुकीमुळे खात्यातून परस्पर काढून घेतलेली ३७ हजार रुपयांची रक्कम संबंधित खातेदाराला परत मिळवून देण्यात बँक अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही रक्कम अवघ्या काही दिवसांत परत मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी गोलवाडी शाखेतील एका खातेदाराच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन व्यवहाराद्वारे ३७ हजार रुपये काढून घेतले. ही बाब लक्षात येताच संबंधित खातेदाराने तातडीने बँकेशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. यानंतर बँक प्रशासनाने त्वरित हालचाली करत संबंधित व्यवहारांची माहिती संकलित केली आणि खाते होल्ड करण्याची प्रक्रिया राबवून पुढील आर्थिक नुकसान टाळले.
बँकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर ९ जून रोजी खातेदाराला संपूर्ण ३७ हजार रुपयांची रक्कम परत मिळाली. या प्रक्रियेत समर्थनगर शाखेच्या शाखाधिकारी स्वाती देशमुख, गोलवाडी शाखेचे शाखाधिकारी जितेंद्र केदार तसेच मुख्यालयातील मनीष माहुलकर यांनी विशेष प्रयत्न केले.
रक्कम परत मिळाल्यानंतर खातेदाराने बँक अधिकाऱ्यांच्या तत्परतेबद्दल आणि सहकार्याबद्दल समाधान व्यक्त करत त्यांचे कौतुक केले.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*