छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवरील हॉटेल अमरप्रीत येथे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला.

तपासणीवेळी चिलिंग सेंटर आणि स्टोअर रूममध्ये सडलेल्या व मुदतबाह्य भाज्या आढळल्या. यामध्ये काकडी, ढोबळी मिरची, फुलकोबी आणि पत्ताकोबीचा समावेश होता. तसेच मुदतबाह्य मशरूम आणि पिझ्झा बेसचा साठा आढळून आला.

हॉटेलमध्ये विना लेबल असलेला मार्गारीनचा साठाही आढळला. मेनू कार्डमध्ये बटरचा उल्लेख असलेल्या बटर चिकन, बटर तंदुरी रोटी आणि ग्रेव्हीमध्ये बटरऐवजी मार्गारीनचा वापर केला जात असल्याचा संशय तपासणीदरम्यान व्यक्त करण्यात आला.

स्वयंपाकघरात सांडपाणी साचलेले तसेच उघड्या कचराकुंड्या आढळल्या. अन्नपदार्थांच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या ‘फर्स्ट इन, फर्स्ट आऊट’ (FIFO) पद्धतीचे पालनही केले जात नसल्याचे निदर्शनास आले.

या उल्लंघनांच्या पार्श्वभूमीवर हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला असून, निलंबन कालावधीत अन्नपदार्थांचे उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विक्री अथवा ग्राहकांना अन्नसेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,625 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क