Tag: #छत्रपतीसंभाजीनगर

पडेगाव – मिटमिटा परिसरात गॅस कटरने फोडले एटीएम ; लाखोंची रोकड लंपास 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पडेगाव-मिटमिटा परिसरात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएम सेंटरमध्ये चोरट्यांनी शटर बंद करून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडले आणि दोन ते तीन लाख रुपयांची रोकड…

आषाढी एकादशीसाठी प्रति पंढरपूर सज्ज – लाखो भाविकांसाठी सुसूत्र नियोजन

छत्रपती संभाजीनगर : यंदा ६ जुलै रोजी साजरी होणारी आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणावर भक्तगणांना आकर्षित करणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही वाळूज परिसरातील प्रति पंढरपूर येथे लाखो भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन,…

बिबी का मकबरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य सोहळा; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : या वर्षीचा आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवार, २१ जून रोजी साजरा होणार असून जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बिबी का मकबरा प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे.…

तारांचा स्पर्श होऊन दोन निष्पापांचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको

छत्रपती संभाजीनगर : महावितरणच्या निष्काळजीपणामुळे चिकलठाणा परिसरातील दोन निष्पाप ग्रामस्थांना आपला जीव गमवावा लागला. वादळात वाकलेल्या हायटेंशनच्या पोलवरील तारा जमिनीपर्यंत लोंबकळत असतानाही महावितरणने कोणतीही कारवाई न केल्यामुळे कचरू जनार्धन दहिहंडे…

🚨 “चोरांचे शहरात पुन्हा आगमन – भरदिवसा घरे फोडून पोलिसांना आव्हान”

छत्रपती संभाजीनगर : शहरात काही दिवसांच्या शांततेनंतर पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून सलग तिसऱ्या दिवशी घरफोडीची घटना घडली आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दिवसात दोन घरफोड्यांचे गुन्हे…

२० वर्षांनंतर सिद्धार्थ उद्यानात पुन्हा सिंहाची डरकाळी!

छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यानासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २० वर्षांनंतर प्राण्यांच्या अदलाबदलीला मंजुरी दिली असून, लवकरच उद्यानात सिंहाची जोडी दाखल होणार आहे. कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून सिंहाची जोडी…

⚡ ऐन पेरणीच्या काळात आकाशातून संकट! विजेच्या तडाख्याने दोन सख्खे भाऊसह चार शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात शनिवारी दुपारी वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये चार नागरिकांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. याशिवाय चार जनावरे ठार झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक…

एन-४ मध्ये घरफोडी : सीसीटीव्हीची दिशा फिरवून चोरट्यांनी केले ८ तोळ्यांचे दागिने आणि रोख रक्कम लंपास

छत्रपती संभाजीनगर : शहरातील एन-४ सिडको परिसरात एका घरात घडलेल्या धाडसी घरफोडीमुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घराच्या भोवती बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा फिरवून चोरट्यांनी घरात प्रवेश…

🚆 वंदे भारत आता नांदेडहून – वेळेच्या बदलाने संभाजीनगरकर प्रवाशांची चांगलीच पंचाईत!

छत्रपती संभाजीनगर : वंदे भारत एक्सप्रेस आता नांदेडपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे परभणी व नांदेडमधील प्रवाशांची सोय झाली आहे. मात्र, या बदलामुळे छत्रपती संभाजीनगरच्या प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार…

छत्रपती संभाजीनगरात वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी; दोन दिवसांत मान्सून सक्रिय होण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगर : शहरात गुरुवारी (दि. १२ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मृगधारांचा पाऊस झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर आलेल्या या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क