NURSES PROTEST FOR PROMOTIONS AND ALLOWANCES
छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे गुरुवारी परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र गवर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा इंदूमती थोरात, शासकीय परिचारिका संघटनेच्या अध्यक्ष शुभमंगल भक्त, द्रोपदी कर्डिले, महेंद्र सावळे, प्रतिभा अंधारे, कालिंदी इधाटे, वंदना कोळनुरकर, प्रवीण व्यवहारे, नवाज सय्यद आदींनी सहभाग घेतला.
संघटनेचा पदोन्नतीसाठी ठाम आग्रह
परिचारिकांच्या पदोन्नती ही सेवाजेष्ठतेच्या आधारेच द्यावी अशी संघटनेची आग्रही मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संदर्भात पत्रव्यवहार आणि बैठका झाल्या असूनही पदोन्नती रखडलेली आहे. परिणामी, परिचारिका संतप्त झाल्या असून त्यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे.
प्रमुख मागण्या:
- परिचारिका भत्ता वाढवावा
- ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करावे
- बंधनपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करावा
- बक्षी समिती खंड-२ मधील अन्याय दूर करावा
- अधिपरिचारिका पदासाठी होणाऱ्या परीक्षेत सूट द्यावी
परिचारिकांचे हे आंदोलन राज्यभर सुरू असून सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/CUZxUMpm5nG0dcievrzNlr
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*