छत्रपती संभाजीनगर: शहरात पुन्हा एकदा पाणीटंचाई जाणवणार आहे, कारण महापालिकेने पाइपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल ३६ तासांचा शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (२० मार्च) सकाळी ११ वाजता जायकवाडीतून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे दोन दिवस शहरात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांनी दिली आहे.

शटडाऊन दरम्यान रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाखालील १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. यासोबतच नक्षत्रवाडी पाणीपुरवठा केंद्र, फारोळा, जायकवाडी आणि अन्य ठिकाणी लहान-मोठ्या गळती आणि विद्युत विभागाच्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे अत्यावश्यक असून महापालिकेला आधीच शटडाऊन घ्यायचे होते. मात्र, तांत्रिक बिघाडांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने तो निर्णय लांबणीवर गेला होता.

कसे निर्माण झाले संकट?

मागील आठवड्यात रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाजवळ तिरुपती सोसायटीच्या परिसरात नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ११०० मिमी व्यासाची जलवाहिनी बसवताना मनपाच्या १४०० मिमीच्या जलवाहिनीला धक्का बसला. त्यामुळे गळती सुरू झाली. मात्र, संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते. दोन दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला.

नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा!

दुरुस्तीच्या कालावधीत शहरभर पाणीटंचाई जाणवणार आहे. याशिवाय, काही ठिकाणी दुरुस्तीला अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी साठवून ठेवावे आणि त्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Br29avqYAlRCU4ytjYm4PJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

883 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क