छत्रपती संभाजीनगर : बोअरवेलच्या गाडीचे चाक अचानक फुटल्याने गाडीवरील ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला खोलात कोसळली. या अपघातात गाडीवरील जड पाईप अंगावर पडून दोन परराज्यातील मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी ९.३० वाजता झाल्टा फाटा ते केंब्रिज चौकदरम्यान भिमवाडी परिसरात झाला.

या अपघातात लच्छा कृष्णा संता (५५) व बोंदु संता (२८, दोघेही मुळ रा. ओडिशा) यांचा मृत्यू झाला. हे दोघे काही महिन्यांपूर्वी शहरात बोअरवेलच्या कामासाठी आले होते. ‘एकता बोअरवेल’ या खासगी कंपनीत ते काम करत होते. बुधवारी सकाळी ते अन्य पाच सहकाऱ्यांसह बोअरवेलच्या गाडीवरून झाल्टा फाट्याकडून केंब्रिज चौकाच्या दिशेने जात होते. यावेळी भिमवाडी परिसरात अचानक चाक फुटल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल भागात उलटली.

गाडीत पाईप व अन्य अवजड साहित्य होते. अपघातावेळी ते साहित्य लच्छा व बोंदु यांच्या अंगावर पडल्याने ते जागीच ठार झाले. अन्य तिघे कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सोमनाथ जाधव व सहायक फौजदार सतिश जोगस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृत कामगारांच्या नातेवाइकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून पुढील तपास सहायक फौजदार सतिश जोगस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,767 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क