छत्रपती संभाजीनगर : गोड बोलून विश्वास संपादन करत एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून तब्बल ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. ओएसिस चौक ते रेल्वे स्टेशनदरम्यान ऑटो रिक्षात ही घटना घडली असून, अज्ञात तरुणीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कमल उत्तम तुरुकमाने (वय ६७, रा. एकता नगर, रांजणगाव शे.पु.) या आपल्या भाचीच्या लग्नासाठी शहरात आल्या होत्या. त्या रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी ओएसिस चौकातून एका ऑटो रिक्षामध्ये बसल्या. रिक्षामध्ये त्यांच्या शेजारी २५ ते ३० वयोगटातील एक अनोळखी तरुणी बसली होती. तीने कमल तुरुकमाने यांच्याशी गप्पा मारत विश्वास संपादन केला.

“आजकाल गळ्यात सोन्याचे दागिने घालून फिरू नका, नुकतीच एक आजी फसली,” असे सांगत तिने सावध राहण्याचा सल्ला दिला. त्यावर विश्वास ठेवून तुरुकमाने यांनी आपल्या गळ्यातील १५ ग्रॅमची पोत, एक पेंडंट आणि १० ग्रॅमचा एक हार असे दागिने पिशवीत ठेवले. मात्र रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर त्यांनी पिशवी उघडून पाहिली असता, दागिने गायब असल्याचे लक्षात आले.

दागिन्यांची एकूण किंमत अंदाजे ९० हजार रुपये असून, याप्रकरणी अज्ञात तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,182 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क