पैठण : चिंचाळा शिवारातील एका शेतातील विहिरीत मुंडके नसलेला वृद्धाचा मृतदेह शुक्रवारी (ता. ९) सकाळी ९ वाजता आढळून आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून मृत इसमाची ओळख नामदेव एकनाथराव ब्रह्मराक्षस (वय ६०, रा. चिंचाळा, ता. पैठण, ह.मु. छत्रपती संभाजीनगर) अशी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रह्मराक्षस हे बीड जिल्ह्यातील गेवराई येथील न्यायालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते पुन्हा आपल्या मूळ गावी चिंचाळा येथे वास्तव्यास आले होते. त्यांच्या नावावर चिंचाळा शिवारात गट क्रमांक १२१ मध्ये शेती असून, त्याच शेतातील विहिरीत त्यांचा धडमात्र, पण मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला.

या भीषण घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पैठण पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय देशमुख, पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे पाटील आणि जमादार किशोर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला आहे.

या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,624 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क