पैठण : पैठण शहराजवळील शहागड फाट्यावर वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ३३ वर्षीय ललिता पालवीया या महिलेचा मृत्यू झाला असून, १३ जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

शनिवारी रात्री वीटभट्टीवर काम करणाऱ्या मध्य प्रदेशातून आलेल्या परप्रांतीय मजुरांनी चिकन, मटण व मासे खाल्ल्यानंतर झोप घेतली. मात्र, रविवारी सकाळी उठल्यानंतर त्यांना मळमळ, उलटी, चक्कर येणे अशा लक्षणांची तक्रार जाणवू लागली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रकृती गंभीर झालेल्या ललिता पालवीया यांना तत्काळ पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उर्वरित मजूर आणि त्यांची लहान मुले पैठणमधील खासगी रुग्णालयात उपचाराधीन आहेत.

शहागड फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्या असून, जवळपास सव्वाशे वीटभट्टीवर परप्रांतीय मजूर काम करत आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती या घटनेनंतर खालावली आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,484 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क