छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगावजवळ आज सकाळी भीषण अपघात घडला. वेगात असलेली कार अचानक पलटी झाल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अडीच वर्षांची नूरवी चव्हाण व २९ वर्षीय रोहिणी चव्हाण यांचा समावेश आहे.

ही घटना वडीगोद्री पुलाजवळ घडली असून, अपघातग्रस्त सर्वजण छत्रपती संभाजीनगरमधील एन-४ भागातील रहिवासी आहेत. कार उलटल्यामुळे मोठा आवाज झाला आणि आजूबाजूचे नागरिक तातडीने मदतीस धावले.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि एका बाळाचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी तत्काळ जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोन जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अपघाताची नोंद प्रक्रिया सुरू आहे.

हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिस करत आहेत. वाहनचालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JKRmORhlDKD41spUTgpnVl

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,006 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क