छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर पैसे पडल्याची थाप मारून माजी सैनिकाच्या दुचाकीवर ठेवलेली ६ लाख ८० हजारांची रोकड चार चोरट्यांनी लंपास केली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १४) दुपारी सव्वाचार ते पाचच्या दरम्यान मयूर पार्क परिसरातील टेहरे ज्वेलर्ससमोर घडली. चोरट्यांनी पाळत ठेवून हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले आहे.

फिर्यादी मनोहर रामचंद्र कानडजे (वय ४३, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) हे माजी सैनिक असून त्यांनी मूळगावी दहिगाव (ता. भोकरदन) येथे ३० गुंठे जमीन ४० लाखांत खरेदी केली. या व्यवहारासाठी त्यांनी मयूर पार्क येथील एसबीआय बँकेतून ६ लाख ८० हजार रुपये काढले होते. रक्कम प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून दुचाकीच्या पेट्रोल टाकीवर ठेवून ते घरी निघाले होते.

ते टेहरे ज्वेलर्ससमोर पोहोचताच दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी “तुमचे पैसे खाली पडलेत,” असे सांगून पुढे निघून गेले. कानडजे यांनी दुचाकी थांबवून मागे पाहिले असता रस्त्यावर २० रुपयांच्या चार-पाच नोटा पडलेल्या दिसल्या. त्या उचलण्यासाठी त्यांनी पैशांची पिशवी दुचाकीवरच ठेवली. तेवढ्यात चोरट्यांनी संधी साधून पिशवी लंपास केली.

हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हसूल पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पोलिस पुढील तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,262 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क