गजानन राऊत प्रतिनिधी / वाळूज : वाळूज परिसरातील बजाजनगर येथील उच्चभ्रू वसाहतीत एका उद्योजकाच्या बंद घरावर सहा दरोडेखोरांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून तब्बल ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याची लूट केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटना प्लॉट नंबर RL-93 मधील असून, येथे संतोष लड्डा हे उद्योजक वास्तव्यास आहेत. सध्या लड्डा कुटुंब अमेरिका दौऱ्यावर असून, घराची देखभाल संजय झळके हे केअरटेकर करत होते.
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्री एकच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी या घरावर हल्ला चढवला. यातील दोन आरोपींनी गेटमधून आत प्रवेश करून केअरटेकर झळके यांना बंदुकीचा धाक दाखवून घरात प्रवेश केला.
घरातील कपाटात ठेवलेली ४० किलो चांदी व ८ किलो सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर परिसरातील व्यावसायिक व रहिवाशांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरोडेखोरांचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/JWPLw3ii1wAKDICCoiRTdD
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*