वैजापूर : तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात महिला किर्तनकार ह.भ.प. संगीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अखेर पोलिसांनी या प्रकरणातील दोघा आरोपींना अटक करून खळबळजनक तपशील उघड केला आहे.

ही घटना २७ जून रोजी घडली होती. चोरटे मंदिरात चोरीच्या उद्देशाने शिरले होते. त्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी, मूर्त्या आणि इतर साहित्य चोरले. त्यानंतर मंदिराबाहेर झोपलेल्या संगीताताई पवार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या केली. त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की, महालगाव शिवारात एका संशयिताची हालचाल आहे. पोलीस पथकाने तेथे धाव घेऊन संतोष उर्फ भायला चौहान (रा. मध्यप्रदेश, सध्या वैजापूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा विलाला हा मध्यप्रदेशात पळाल्याचे सांगितले. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये शिरपूर येथे धाड टाकून अनिललाही अटक केली.

दोन्ही आरोपींनी चोरीच्या उद्देशाने गुन्हा केल्याची कबुली दिली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना विरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे किर्तनकार संगीताताई पवार यांच्या हत्येचा तपास वेगाने पुढे सरसावला असून संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,648 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क