छत्रपती संभाजीनगर : देशातील पहिले आणि जगातील पाचवे अंध आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे निकेत श्रीनिवास दलाल (वय ४३, रा. खडकेश्वर) यांचा मंगळवारी (दि. १ जुलै) सकाळी कार्तिक हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. निकेत हे माजी उपमहापौर लता दलाल यांचे चिरंजीव होते.

निकेत यांचे सोमवारी रात्री त्यांच्या घरात अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा मारा करण्यात आला होता. त्यामुळे घर ओलसर झाल्याने काही सदस्य नातेवाईकांकडे गेले. निकेत हे पहाटे दोनच्या सुमारास मित्रांसह कार्तिक हॉटेलमध्ये गेले होते. मित्र त्यांना हॉटेलमध्ये सोडून परतले, तर निकेत खोली क्रमांक ३१७ मध्ये मुक्कामी होते. मंगळवारी सकाळी ते पार्किंगमध्ये गंभीर अवस्थेत आढळले. दुसऱ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्यांच्या हाताला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली होती. उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच मित्रपरिवार व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी दिली.

निकेत यांची जीवनकहाणी प्रेरणादायी होती. लहानपणी सायकलचा स्पोक डोळ्यात लागून एक डोळा गेला आणि पुढे ल्युकेमिया रोगामुळे दुसऱ्या डोळ्याचीही दृष्टी गेली. तरीही खचून न जाता त्यांनी स्पीच थेरपिस्ट म्हणून कार्य सुरू ठेवलं. २०१८ साली दुबई येथे आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी देशातील पहिले आणि जगातील पाचवे अंध आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला होता. त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BQJO3GSQlZh881t2Q5PQXa?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,058 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क