छत्रपती संभाजीनगर :  शहरातील दिल्ली गेट ते हसूल टी पॉइंटदरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेदरम्यान सोमवारी (दि. ७ जुलै) सकाळी काही काळ तणाव निर्माण झाला. महापालिका आणि पोलिस पथकावर टोळक्याने धाव घेत दगडफेक, शिवीगाळ, धक्काबुक्की केली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात १८ ते १९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने प्रभारी सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विरोधी मोहीम सुरू असताना डी लाईट ज्यूस सेंटरजवळ हा प्रकार घडला. पोलिस आयुक्त प्रवीण पवार देखील मोहिमेवेळी उपस्थित होते. रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात त्यांनी अधिकाऱ्यांना त्वरित गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले.

रियाज, जुबेर झहीर बागवान, रफिक यांचा मुलगा व १२ ते १५ अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  त्यांनी पथकावर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. नागरी मित्र पथकातील

या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून रात्री उशिरा कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त पवार यांनी सांगितले की, “अशा मोहिमेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अन्यथा अशा प्रकारांचा ट्रेंड तयार होतो.”

पुढील अतिक्रमण कारवायांमध्ये अशा प्रकारची अडथळा आणणाऱ्या व्यक्तींवर पोलिस प्रशासन स्वतःहून कठोर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,910 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क