छत्रपती संभाजीनगर : शहरात वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करून एटीएम कार्डची अदलाबदली करत लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ९४ एटीएम कार्ड, पाच मोबाइल फोन आणि एक रिक्षा (एमएच २० ईएफ ८८३०) जप्त करण्यात आली आहे.

अटकेतील आरोपींची नावे अशी आहेत: शबाना हरून खान (४२, रा. एकतानगर, हर्सूल), नसीम खान कल्लू खान (२९, रा. पलवल, हरियाणा), इरफान रज्जाक शेख (३६), समीर शेख रज्जाक (२१, दोघेही रा. मिसारवाडी), आणि तौफिक फारूख खान (३३, रा. पलवल, हरियाणा). या सर्वांना न्यायालयाने ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

मुख्य आरोपी शबाना खान ही शहरातील गर्दीच्या भागांमध्ये वयोवृद्धांना गाठून त्यांचे एटीएम कार्ड चोरायची. नंतर ती हरियाणातील पतीशी संपर्क साधून तेथील नसीम व तौफिक या दोघांना चोरीसाठी बोलवायची. हे दोघे एटीएममध्ये जाऊन हातचलाखीने कार्डची अदलाबदली करत असत. उर्वरित टोळीतील सदस्य त्याच कार्डने इतर एटीएम मधून पैसे काढत.

शबानाने रिक्षा चालकांचा वापर पळ काढण्यासाठी केला. मिसारवाडीतील आरोपी पूर्वी रिक्षाचालक होते. त्यांच्याशी शबानाची ओळख रिक्षा व्यवसायातून झाली होती. आर्थिक प्रलोभनामुळे ते गुन्हेगारी मार्गावर वळले.

पोलिस अधिक तपास करून या टोळीचे आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HbQex02RCSn6wuDgLVSPT5?mode=r_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

801 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क