छत्रपती संभाजीनगर : शहरातील गारखेडा परिसरात बुधवारी सायंकाळी ११ वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा थरारक प्रयत्न ५ जणांच्या टोळीने केल्याची घटना घडली. प्रसंगावधान राखणाऱ्या चिमुकलीच्या हुशारीमुळे आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

काव्या (काल्पनिक नाव) ही सहावी इयत्तेत शिकत असून आईविना ती आजीआजोबांसोबत गारखेडा परिसरात राहते. वडील हैदराबादमध्ये आहेत. ती रोज गारखेडा येथील नाथ प्रांगणातील ट्युशन क्लासला जाते.

बुधवारी संध्याकाळी क्लास संपल्यानंतर एक व्यक्तीने तिच्या चालक नवनाथ खेडे यांना पत्ता विचारत गुंतवले. त्याचवेळी इतर चार जण गाडीतून उतरले आणि काव्याला बळजबरी गाडीत बसवले. हे दृश्य पाहून चालक व स्थानिकांनी आरडाओरड करत गाडीचा पाठलाग केला. काहींनी दगडफेक करून अपहरणकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.

काव्याने देखील धाडस दाखवत एका अपहरणकर्त्याच्या हाताला चावा घेतला. तिने त्यांना पोलीस नियंत्रण कक्षाचा ‘१००’ नंबर दिला आणि वडील पोलीस अधिकारी असल्याचे भासवले. घाबरलेल्या आरोपींनी तिला रस्त्यातच सोडून पलायन केले.

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अपहरणकर्त्यांची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही व वाहन तपासणी केली जात आहे.

शहरात या घटनेमुळे खळबळ उडाली असून गारखेडा परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L1Hjnh1fHKDJBUpjMQYvag?mode=ac_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,831 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क