गंगापूर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ईसरवाडी फाटा (ता. गंगापूर) येथे बुधवारी (६ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास एसटी बस व मालवाहू कंटेनर यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन आठ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून सर्वांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गंगापूर आगाराची बस (क्रमांक एमएच 14 बीटी 3042) चालक अनिल वाकचौरे व वाहक अझरुद्दीन अकतार यांच्या ताब्यात छत्रपती संभाजीनगरकडून गंगापूरकडे जात होती. दरम्यान, मालवाहू कंटेनर (क्रमांक केए 38 ए 6166) अहिल्यानगरकडून बिडकीनकडे जात असताना ईसरवाडी फाट्यावर अचानक वळण घेतले. समोरून येणाऱ्या बसला टाळण्यास वेळ न मिळाल्याने दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली.

अपघातात बस चालक वाकचौरे यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले, तर वाहकासह इतर सहा प्रवासी समोरील सिटवर आदळून गंभीर जखमी झाले. काहींच्या चेहऱ्यावर मार लागून दात पडले. नानिज धामच्या रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी विनामूल्य अॅम्बुलन्सचे पायलट संदीप त्रिंबके व स्थानिकांनी जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात पोहोचवले.

अपघात इतका भीषण होता की बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला, तर कंटेनरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे व पथक घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.

जखमींची नावे:
सायली संतोष वल्ली (२४, अहील्यानगर), पूजा सिद्धराम अचलेरे (२२, सिडको, छत्रपती संभाजीनगर), गीता विजयकांत गायकवाड (५५, नंदनवन कॉलनी, संभाजीनगर), प्रशांत जाधव (२५, शिवाजीनगर, संभाजीनगर), संदीप सुधाकर दहिभाते (३७, पवननगर, संभाजीनगर), राज अशोक गिरी (३१, पिंपळदरी, हिंगोली), मनोहर भाऊसाहेब गव्हाणे (३१, राक्षी, ता. शेवगाव, अहील्यानगर) व बस चालक अनिल सुभाष वाघचौरे (गंगापूर आगार).

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/JSSiEY9kjDk9Lt15YSifLu?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,236 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क