छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक नकाशावर एक महत्त्वपूर्ण अध्याय जोडला जाणार आहे. राज्य सरकारकडून मंगळवारी (दि. १९ ऑगस्ट) मंत्रालयात झालेल्या बैठकीत आठ महत्त्वाच्या सामंजस्य करारांसह दोन धोरणात्मक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरलेला करार म्हणजे ऑरिक, एमआयटीएल परिसरात होणारा ४७०० कोटी रुपयांचा गुंतवणूक प्रकल्प.

या करारानुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये ६ गिगावॅट क्षमतेचा सोलर सेल आणि मॉड्यूल उत्पादन प्रकल्प उभारला जाणार असून, त्यातून सुमारे २५०० थेट रोजगाराच्या संधी निर्माण होतील. स्वच्छ ऊर्जेच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प मोलाची भूमिका बजावेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

या कराराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव राजेशकुमार, उद्योग सचिव डॉ. पी. अन्बलगन आणि प्रमुख गुंतवणूकदार उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील गुंतवणुकीची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी शासनाची संपूर्ण टीम गुंतवणूकदारांसोबत थेट काम करेल. या प्रकल्पामुळे संभाजीनगरचा औद्योगिक विकास वेगाने होईल.”

फक्त सौर प्रकल्पच नव्हे, तर लॉजिस्टिक्स, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी यूकेसोबतही धोरणात्मक करार करण्यात आला आहे. हायपरलूपसारख्या अत्याधुनिक प्रकल्पांची अंमलबजावणी केल्यास महाराष्ट्र केवळ देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर नावारूपाला येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या गुंतवणुकीमुळे केवळ रोजगारच नव्हे, तर स्थानिक व्यवसाय, पुरवठा साखळी आणि ancillary units यांनाही मोठा फायदा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सौर उत्पादन क्षेत्राचा मोठा अध्याय सुरू होण्याची ही ऐतिहासिक संधी ठरेल, असे औद्योगिक तज्ज्ञांचे मत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BDkkFQTfWYqFrhuZAQ180r?mode=ac_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,507 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क