छत्रपती संभाजीनगर : फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील एका नामांकित कंपनीत नोकरी करणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.७) सायंकाळी घडली. ‘मम्मी, आजी-आजोबा व भाऊ, मला माफ करा’ असे लिहिलेली सुसाईड नोट घटनास्थळी सापडली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणीचे नाव निकिता रवींद्र पवार (रा. वांजुळपोई, ता. राहुरी, जि. अहमदनगर, ह.मु. अविष्कार कॉलनी, छ.संभाजीनगर) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकिता ही ३० जूनपासून अविष्कार कॉलनीत अन्य दोन मुलींसोबत राहायला आली होती. मात्र, सुट्टीमुळे तिच्या रूममेट्स गावी गेल्या होत्या. रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास खालच्या मजल्यावरील मुलींनी तिला जेवायला बोलावण्यासाठी आवाज दिला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा ढकलला असता तो आतून बंद असल्याचे दिसून आले. मुलींनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

सिडको पोलीस ठाण्यातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता निकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. तिला त्वरित घाटी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सोमवारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास हवालदार येडूबा तेलुरे करीत आहेत.

घटनास्थळी पोलिसांना एक पानावर लिहिलेली सुसाईड नोट सापडली. त्यात “मम्मी, आजी-आजोबा व भाऊ, मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल” असे लिहिले होते. तसेच दोन पानांवर काही मजकूर लिहून तो चुरगाळून फेकून दिलेला आढळला आहे. पोलिसांनी पंचनाम्यात याचा उल्लेख केला असून निकिताचा मोबाइल जप्त करण्यात आला आहे. मात्र तो लॉक असल्याने त्यातील माहिती अद्याप मिळालेली नाही. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,467 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क