छत्रपती संभाजीनगर : हर्सल कारागृहात सोमवारी (दि.७ सप्टेंबर) दुपारी कैद्यांनी घडवलेल्या गोंधळामुळे कारागृह व्यवस्थापन आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बरॅक क्रमांक २ मध्ये दुपारी गस्त घालताना तुरुंग अधिकारी योगेश शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पाच संशयित कैदी एकत्र बसलेले दिसले. नियमांनुसार हे कैदी वेगवेगळ्या बरॅकमध्ये ठेवलेले असताना ते एका जागी आढळल्याने अधिकारी सतर्क झाले. तपासणीदरम्यान रितेश ऊर्फ विकी पुसे या कैद्याकडे धारदार पत्र्याचा तुकडा आढळला.

या तपासणीनंतर कैद्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून आक्रमक वर्तन केले. त्यांनी शिंदे यांच्यावर धावून जात मारहाण केली. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने शिट्टी वाजवून मदतीसाठी इशारा दिला आणि अन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे तुरुंगातील सुरक्षेची व्यवस्था पुरेशी सक्षम आहे का, यावर संशय निर्माण झाला आहे.

दरम्यान, कारागृहातील कैद्यांची एक टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगवेगळ्या बरॅकमध्ये असलेले हे आरोपी एकत्र कसे आले, याचा तपास सुरू आहे. हे सर्व आरोपी खुनाचा प्रयत्न, अपहरण, लुटमार आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले आहेत. तुरुंगात त्यांनी स्वतःची टोळी तयार करून इतर कैद्यांना धमकावत असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी त्यांच्या दहशतीला आवर घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी गोंधळ घडवून आणल्याचे वृत्त आहे.

या प्रकरणातील पाच आरोपींची नावे अशी आहेत – पवन जैस्वाल (सीआयडी अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला), रितेश पुसे (खुनाच्या प्रकरणात अटक), विनोद शिंदे (ठेकेदाराचे अपहरण करून लूट), आनंद लोखंडे (पत्नीच्या खुनासाठी शिक्षा भोगत आहे) आणि ओम म्हस्के (सराईत गुन्हेगार). या घटनेमुळे कारागृह प्रशासनावर टीका होत असून, सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/INIt76ceHKUABNJR2KWGnv?mode=ems_copy_c

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,041 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क