वाळूज महानगर : तिसगाव शिवारातील धुळे–सोलापूर महामार्गालगत असलेल्या हॉटेल वेलकम येथील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष व दहशतवाद विरोधी पथकाने मंगळवारी (दि. २८) रात्री छापा मारून चार महिलांची सुटका केली. या कारवाईत लॉजचालक, मॅनेजर आणि जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, हॉटेल वेलकम येथे महिलांच्या देहव्यापाराचा धंदा सुरु आहे. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतल्यानंतर कारवाई केली. छाप्यात पश्चिम बंगाल व मध्य प्रदेशातील चार महिलांना वाचविण्यात यश आले. यावेळी ग्राहकांसह चार जण आढळून आले. पोलिसांना पाहताच काउंटरवर बसलेला मॅनेजर रवि पोळ (रा. लासूर स्टेशन) पळून गेला. मात्र लॉजचालक कृष्णा चव्हाण आणि जागा मालक यांच्यासह तिघांवर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सपोनि अनिल कंकाळ, पोअं राजपूत, राशनकर, तसेच दहशतवादी विरोधी पथकाच्या सपोनि जयश्री कृलकर्णी, मपोअं चिंचोलकर यांचा समावेश होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी शिवचरण पांढरे करत आहेत.

या कारवाईमुळे वाळूज परिसरातील अशा बेकायदेशीर धंद्यांवर पुन्हा एकदा पोलिसांनी कडक कारवाई करत जनतेत दिलासा निर्माण केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,808 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क