खुलताबाद : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करत असलेल्या एका चाळीस वर्षीय महिलेने चालत्या बसमधून अचानक उडी घेतल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. २९) खुलताबाद तालुक्यातील सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर गल्लेबोरगावजवळ घडली. मृत महिलेचे नाव कांताबाई योगेश मरमट (वय ४०, रा. देहाडे नगर, हर्सूल सावंगी, छत्रपती संभाजीनगर) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांताबाई मरमट या कन्नड आगाराच्या एसटी बसने (एमएच १४ बीटी ३०३८) गल्लेबोरगाव येथून वेरूळकडे जाण्यासाठी प्रवास करत होत्या. बस पळसवाडी परिसरातून जात असताना अचानक त्या उठल्या आणि कोणालाही काही न सांगता दरवाज्याकडे जाऊन उडी मारली. दुर्दैवाने त्या बसच्या मागील चाकाखाली आल्या, ज्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर प्रवासी व चालक-वाहक हादरून गेले. महिलेच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्यामुळे चेहऱ्याची ओळख पटवणे कठीण झाले होते. घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी मनोहर पुंगळे, बीट जमादार राकेश आव्हाड, महामार्ग पोलिस उपनिरीक्षक इंगोले, तसेच कर्मचारी रामनाथ भुसारे, राठोड, शांताराम सोनवणे आणि शरद दळवी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. चालक, वाहक आणि काही प्रवाशांचे जबाब नोंदवून पुढील तपास खुलताबाद पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,684 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क