पदवीधर मतदारांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी स्वामी यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पाचव्या औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या नव्या मतदार याद्याची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयांमध्ये पदवीधर मतदारांच्या अर्जांचे वितरण व स्वीकृतीची प्रक्रिया सुरु असून, पात्र नागरिकांनी नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

दि. ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पदवीधर मतदारांना ऑफलाईन किंवा ऑनलाईन दोन्ही माध्यमातून नोंदणी करता येणार आहे. यासाठी अर्जदाराने नमुना क्रमांक १८ भरून आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे गरजेचे आहे. मतदार होण्यासाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान तीन वर्षांपूर्वी म्हणजेच १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी पदवी प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाची गुणपत्रिका, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट साईज छायाचित्र या कागदपत्रांच्या प्रती सादर कराव्यात. नावात बदल झाल्यास संबंधित गॅझेट, विवाह नोंद प्रमाणपत्र किंवा प्रतिज्ञापत्र जोडावे. सर्व अर्ज संबंधित तहसिल कार्यालयात स्वीकृत केले जातील.

ऑनलाईन नोंदणीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून https://mahaelection.gov.in/citizen/login ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुकांनी या संकेतस्थळावर मोबाईल ओटीपीद्वारे नोंदणी करून आवश्यक माहिती भरून कागदपत्रे अपलोड करता येतील.

“जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधरांनी ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करून लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. त्यांनी सांगितले की, अधिकाधिक सुशिक्षित मतदार सहभागी झाल्यास निवडणूक प्रक्रियेला पारदर्शकता आणि गुणवत्तेचा नवा आयाम मिळेल.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

686 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क