छत्रपती संभाजीनगर : धुळे–सोलापूर महामार्गावरील सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामात रस्त्यावर करण्यात आलेल्या तड्यांमुळे झालेल्या गंभीर अपघातात २९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हा धक्कादायक प्रकार एसआरपीएफ कॅम्पजवळ शुक्रवारी (७ नोव्हेंबर) सायंकाळी घडला. प्रीती शिवाजी बोंगाणे (रा. एकोड पाचोड) असे मृत महिलेचे नाव असून त्या एका खासगी रुग्णालयात कामाला होत्या.
घटनेवेळी प्रीती या पती शिवाजीसह व पाच वर्षीय मुलीसोबत दुचाकीवरून घरी निघाल्या होत्या. महामार्गावर दुरुस्ती साठी करण्यात आलेल्या तड्यांमुळे दुचाकीचा ताबा सुटला आणि बाइक स्लिप झाली. धक्का बसताच शिवाजी व मुलगी एका बाजूला फेकले गेले, तर प्रीती दुसऱ्या बाजूला खाली पडल्या. त्याच क्षणी पाठीमागून येणाऱ्या भरधाव ट्रक चालकाला ब्रेक लावण्यास वेळ मिळाला नाही आणि ट्रक थेट प्रीती बोंगाणे यांच्या अंगावरून गेला. ट्रकचे चाक पोटावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. रस्त्याची परिस्थिती व दुरुस्तीच्या कामातील हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. या निष्काळजीपणाला जबाबदार कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृत महिलेच्या कुटुंबीयांनी धुळे–सोलापूर महामार्गावर ‘रास्ता रोको’ agitation केले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कंत्राटदारावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच मार्ग मोकळा करण्यात आला. या अपघाताने रस्ते कामातील निष्काळजीपणा आणि सुरक्षिततेच्या अभावाबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
________________________
*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*
https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt
*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*