छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत केव्हा होणार याबाबत प्रशासनाने केलेल्या वारंवार बदलांमुळे राजकीय वर्तुळात संभ्रम निर्माण झाला होता. सुरुवातीला ११ नोव्हेंबर रोजी सोडत काढण्याची घोषणा झाली होती. त्यानंतर अचानक बदल करून १० नोव्हेंबर निश्चित करण्यात आले. मात्र शुक्रवारी पुन्हा निर्णय बदलत सोडत ११ नोव्हेंबरलाच घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले.

सोडतीपूर्वी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात प्रशासक जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम घेण्यात आली. काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी अधिकाऱ्यांना विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या असून, मुख्य नियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आरक्षणाची प्राथमिक रूपरेषाही जाहीर करण्यात आली आहे. ओबीसीसाठी ३१ जागा राखीव असून त्यापैकी १६ जागा महिलांसाठी असतील. एसटी प्रवर्गासाठी २ जागा, त्यापैकी एक महिला; तर एससी प्रवर्गासाठी एकूण २२ जागा राखीव असून त्यातील ११ महिला जागा आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठीही ३० जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.

निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असताना सोडतीतील बदलामुळे उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्षांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आता सर्वांचे लक्ष ११ नोव्हेंबरच्या सोडतीकडे लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

767 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क