छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातील रांजणगाव शिवाराजवळील एका दुमजली घरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर शुक्रवारी (दि.७) रात्री पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून २७ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, घरमालक, हॉटेल चालक व या रॅकेटशी संबंधित अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते सर्व फरार आहेत.

पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाला काही गरजू महिलांना एका घरात डांबून आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी योजना आखून शुक्रवारी रात्री ९.४३ वाजता छापा टाकला. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव, पोउपनि वैभव मोरे आणि महिला पोलीस कर्मचारी सहभागी होते.

छाप्यादरम्यान दोन महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे स्पष्ट झाले. या महिलांना त्वरित सुरक्षिततेत आणण्यात आले. चौकशीदरम्यान पीडितांनी कॅटरिंगच्या कामासाठी बोलावून त्यांची फसवणूक झाल्याचे सांगितले. घटनास्थळावरून दोन ग्राहक – मिलिंद पोपट पवार (रा. खिर्डी, वैजापूर) आणि ललीत विजय बडगुजर (रा. साईनगर, एन-४, छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेण्यात आले.

तर कुंटणखाना चालक, हॉटेल ‘सागर’चा मालक विकी हायलिंगे, राहुल बनकर (रा. रांजणगाव) तसेच घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ते फरार आहेत. पोलिसांनी मोबाईल फोनसह अन्य वस्तू जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

4,327 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क