छत्रपती संभाजीनगर : धुळे-सोलापूर महामार्गावर नक्षत्रवाडी परिसरात आज सकाळी सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना यू-टर्न घेत असलेल्या आयशर वाहनाखाली दुचाकी आल्याने घडली. मृतांची ओळख राधा गोमलाडू आणि गजानन गोमलाडू अशी झाली असून, त्यांचा मुलगा विशाल गोमलाडू हा गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोमलाडू कुटुंब आजारी सासऱ्यांना भेटण्यासाठी दुचाकीवरून जालन्याकडे जात होते. दरम्यान, नक्षत्रवाडी जवळील यू-टर्न घेत असताना आयशर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आयशर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी महामार्गावरील बेफिकीर वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HECW4lJo5J4AfPZGuYcj4E?mode=wwt

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

5,681 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क