छत्रपती संभाजीनगर : खोट्या जन्मतारखा, जन्मस्थळ, शपथपत्रे आणि खोटे दस्तऐवज सादर करून शासनाची फसवणूक करीत जन्म प्रमाणपत्र मिळविल्याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ या कालावधीत घडल्याचे तपासात समोर आले आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट कठीराम राठोड यांनी यासंदर्भात तक्रार दिली असून तिच्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, जन्म नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या २९ जणांनी सादर केलेल्या दस्तऐवजांची प्रशासनाने सखोल तपासणी केली असता पुरावे चुकीचे, दिशाभूल करणारे तसेच सरसकट खोटे आढळले. दिलेली माहिती, साक्षीदारांचे दाखले, व्यवहार व नोंदी यांमध्ये मोठी विसंगती दिसून आली. विशेषतः राहण्याच्या पत्त्यातील फरक, पालकांच्या माहितीतील तफावत आणि दाखल केलेल्या जन्मतारखांमध्ये बनावटीपणा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सरकारी नोंदीत खोट्या माहितीच्या आधारे नोंदी करण्यात आल्याने फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी संजय रामचंद्र गवळी, हबीब अहमद शेख, नैना शांतीलाल हनवते, धरमसिंग श्रावणसिंग ब्रह्मणावत, संजय उत्तम लकडे, तुळशीराम दादासाहेब कोरडे, रियाज नानू सय्यद, शेख अस्लम शेख गणी, शेख रफिक शेख मेहबुब, रिजवाना शेख गफुर, श्रीधर पुंजराम टारपे, संतोष सांडू दाभाडे, स्वप्नील दशरथ दोंदे यांच्यासह एकूण २९ जणांची नावे समोर आली आहेत. सर्व आरोपींवर संबंधित कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.

दरम्यान, लातूर जिल्ह्यातही अशाच प्रकारे जन्म नोंदणीतील गैरप्रकार उघडकीस आले असून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांनी दिलेली एक हजार ९४६ जन्म प्रमाणपत्रे तातडीने रद्द करण्यात आली आहेत. यापैकी एक हजार ४०० पेक्षा जास्त प्रमाणपत्रे परत घेण्यात आली असून उर्वरित प्रमाणपत्रे परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. जन्म नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/FkdbQ7CBnF2FSoNwbVDkV8

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,005 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क