छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील कडेठाण येथे दारूच्या नशेत वारंवार घरी वाद घालणाऱ्या वडिलांचा मुलाने संतापाच्या भरात खून करून घरातच मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहा दिवसांनी परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे या घटनेचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

खून झालेल्या व्यक्तीचे नाव कल्याण बापूराव काळे (वय ५८) असे असून आरोपी मुलाचे नाव राम कल्याण काळे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण काळे हे पत्नी आणि दोन मुलांसोबत कडेठाण गावात वास्तव्यास होते. त्यांचा मोठा मुलगा ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेला असताना, लहान मुलगा राम आणि वडील घरी होते. कल्याण काळे हे दारूच्या व्यसनामुळे वारंवार घरी वाद घालायचे. त्यामुळे घरात सतत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दहा दिवसांपूर्वीही कल्याण काळे दारू पिऊन घरी आले आणि वडील-मुलामध्ये पुन्हा वाद उफाळला. संतापाच्या भरात राम याने वडिलांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत कल्याण काळे यांचा मृत्यू झाला. पुढील गुन्हा झाकण्यासाठी रामने वडिलांचा मृतदेह घरातच खोदलेल्या खड्ड्यात पुरला. त्याची पत्नी मानसिक आजाराने ग्रस्त असल्याने तिने कोणालाही ही बाब सांगितली नाही.

दरम्यान घरा परिसरात दुर्गंधी पसरू लागल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिस, महसूल विभाग तसेच फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून घरात पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी संशयित म्हणून राम याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. “वडील रोज दारू पिऊन वाद घालत असल्याने मी संतापलो आणि खून केला,” असे त्याने सांगितले.

या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी मुलाला पुढील तपासासाठी न्यायालयात हजर केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,737 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क