छत्रपती संभाजीनगर : हर्सूल परिसरातील होनाजीनगरमध्ये अवघ्या १९ वर्षांच्या मुलीने कॉलनीतीलच एका मुलाच्या प्रेमात आकंठ बुडून स्वतःच्या घरातच दोन वेळा चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरच्यांनी प्रेमसंबंधांना विरोध केल्यानंतर प्रथम ११ लाख रुपये घेऊन पळून गेलेल्या मुलीने, पालकांनी दिलेल्या माफीनंतर काही महिन्यांनी पुन्हा घरातील सोन्याचे दागिने चोरून प्रियकरासह फरारी झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने उस्मानपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होनाजीनगर येथील या मुलीचे शेजारी राहणाऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते. हे प्रकरण दोघांच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी या नात्याला विरोध दर्शवला. त्यामुळे तरुण-तरुणीने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. पळण्यासाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून मुलीने घरातील तब्बल ११ लाख रुपयांची रोकड चोरून प्रियकरासोबत पलायन केले. मात्र बाहेरची प्रतिकूल परिस्थिती आणि घरच्यांनी सुरू केलेल्या शोधमोहीमेमुळे दोघेही परत आले. तेव्हा पालकांनी “चूक झाली” असे सांगत मुलीला माफ केले आणि इशारा देऊन तिला परत घरी ठेवले.

मात्र काही महिन्यांतच पुन्हा दोघांनी घरातून निघण्याचा कट रचला. यावेळी घरात रोकड ठेवणे पालकांनी बंद केल्याने तरुणीने घरातील सुमारे २ तोळे सोन्याचे दागिने चोरले. चोरी गेलेल्या सोन्यात १० ग्रॅमची अंगठी, ३ ग्रॅमची अंगठी, १ ग्रॅमची बाळी आणि ५ ग्रॅमचा सोन्याचा कॉइन यांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार प्रेमीयुगुलांचा शोध सुरू केला आहे. प्रेमाच्या नादात मुलीने घरचा विश्वास आणि भवितव्य दोन्ही धोक्यात घातल्याची खंत परिसरात व्यक्त होत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,609 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क