छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मारहाणीच्या धक्कादायक प्रकाराची सीसीटीव्ही फुटेज आता समोर आली असून परिसरात खळबळ उडाली आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या पिकअप वाहनाच्या चालकासोबत दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांचा किरकोळ वाद झाला. पाहता पाहता हा वाद चिघळला आणि अचानक पिकअपमध्ये बसलेल्या टोळक्याने उतरून त्या दोघा तरुणांवर हल्ला चढवला.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की पिकअपमधून उतरलेले तरुण थेट दुचाकीस्वारांवर धावून गेले आणि त्यांना बेदम मारहाण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पेट्रोल पंपावर काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मारहाणीचा संपूर्ण प्रकार काही सेकंदांत घडला असून त्यानंतर संबंधित टोळके तेथून पसार झाले.

ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. फुटेजच्या आधारे दौलताबाद पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून आरोपींच्या हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. पेट्रोल पंपांसारख्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या अशा थरारक मारहाणीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/HFYPllsnkDF44SYwtqZ04r?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

2,552 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क