छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको परिसरात घरफोडीची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. मुलाला भेटण्यासाठी दुबईला गेलेल्या दाम्पत्याच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना ४ डिसेंबर रोजी डी सेक्टर, पार्क लाईन, एन-१२ येथे समोर आली. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अखील मजीद यार खान (वय ३६, रा. जुबली पार्क, भडकलगेट) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांची आत्या सीमा मिन्हाज खान आणि त्यांचे पती मिन्हाज अहमद खान (वय ६९) हे ३ ऑक्टोबर रोजी मुलाला भेटण्यासाठी दुबईला गेले होते. घराला कुलूप लावून चावी सोबत घेऊन गेले होते, तर वॉल कंपाउंड गेटची चावी साफसफाईसाठी येणारी कर्मचारी रेखा पाटोळे हिला देण्यात आली होती.

दरम्यान, ४ डिसेंबर रोजी दुपारी सुमारास रेखा पाटोळे साफसफाईसाठी घरावर गेल्या असता मुख्य गेट व दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यानंतर त्यांनी शेजारी शेख शरीफ यांना माहिती दिली व त्यांनी अखील खान यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचल्यावर घरातील कपाटे, ड्रॉवर उचकटलेले असल्याचे आढळले.

चोरी गेलेल्या वस्तूंमध्ये ८५ हजार रुपये रोकड, दोन ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, दोन ग्रॅमची सोनसाखळी, चांदीची ११ नाणी आणि एक मोबाईल असा एकूण दीड लाख रुपयांचा ऐवज असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घरफोडीचा गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भागवत मुठाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,150 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क