छत्रपती संभाजीनगर : शहरात मकरसंक्रांतीपूर्वी नायलॉन व चायनीज मांजाची अवैध विक्री वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी छापे टाकून एकूण 55 गट्टू नायलॉन मांजा जप्त केले. या प्रकरणात दोन महिलांसह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस उपनिरीक्षक मेनकुदळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संजयनगर भागात पहिला छापा टाकण्यात आला. यावेळी रिजवाना बेगम निसार शेख (45) व शेख फिरोज हबीब शेख (42) यांच्या ताब्यातून 51 गट्टू नायलॉन मांजा जप्त करण्यात आले. दुसऱ्या कारवाईत सातारा गावातील दुकानातून इस्माईल शेख उर्फ आदिल हाजी शेख (32) याच्याकडील चार गट्टू जप्त करण्यात आले.

नायलॉन व चायनीज मांजा अत्यंत धारदार असल्याने नागरिक, मोटारसायकलस्वार तसेच पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे अशा मांजाच्या विक्रीवर व वापरावर बंदी असूनही काही ठिकाणी गुप्त विक्री सुरू असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले आणि सहाय्यक पोलीस आयुक्त वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

नागरिकांनी नायलॉन मांजाची विक्री किंवा साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यास टोल फ्री 112 किंवा 0240-2240500 या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/L9JEbLmwXyk2LRQDyyWpcA?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,383 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क