छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव रोडवरील तारांगण फाट्याजवळ गुरुवारी (दि. १८) मध्यरात्री सुमारास एक भीषण अपघात घडला. गतिरोधकावर गाडी जोरात आदळल्याने टायर फुटून कार उलटली. या अपघातात देवडी बाजार येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा सोबती गंभीर जखमी झाला आहे.

रवी रविकुमार पारीक (वय ३६, रा. देवडी बाजार, सिटी चौक) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रवी हे आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी कन्नड येथे टाटा सफारी कारने (एमएच-१२-जेसी-४८८८) गेले होते. नातेवाइकांना सोडल्यानंतर ते मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास शहराकडे परत येत असताना तारांगण फाट्यासमोरील गतिरोधकावर त्यांची कार जोरात आदळली.

या धडकेत कारच्या डाव्या बाजूचा समोरील टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार रस्त्यावर उलटून वेगात जवळपास २० ते २५ फूट अंतरापर्यंत फरपटत गेली. या भीषण अपघातात रवी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेला दुसरा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, या अपघातानंतर रस्त्यावरील अशास्त्रीय व धोकादायक गतिरोधकांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तारांगण फाट्यासमोरील गतिरोधकावर कोणतेही रिफ्लेक्टर, पांढरे पट्टे किंवा सूचना फलक नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. या रस्त्यावर यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात घडले असून, प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Db1xJwZQzHhCOL03vSK9xP?mode=hqrt2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,268 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क