छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी कांचनवाडी आणि नक्षत्रवाडी परिसर अक्षरशः टार्गेट केल्याचे समोर आले आहे. अवघ्या पाच दिवसांत या भागात भरदिवसा दोन घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २० डिसेंबर रोजी कांचनवाडीतील गिरीकुंज सोसायटीमध्ये भरदिवसा एका फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याआधी १५ डिसेंबरला नक्षत्रवाडीत दुपारी बारा ते अडीचच्या दरम्यान पवन पाटील यांचे घर फोडण्यात आले होते.

गिरीकुंज सोसायटीतील घटनेप्रकरणी गजानन रमेशराव कुरपतवार (वय ५२, रा. कांचनवाडी) यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ते खासगी नोकरी करतात. शनिवारी नेहमीप्रमाणे गजानन कुरपतवार आणि त्यांची मोठी मुलगी कामावर गेले होते. दुपारी त्यांची पत्नी व लहान मुलगी ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी टॉमीच्या सहाय्याने दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाट उचकून १३ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, तीन ग्रॅमचे फॅन्सी टॉप्स, चांदीचे पायल, मंगळसूत्र, आर्टिफिशिअल दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.

सायंकाळी गजानन कुरपतवार घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ सातारा पोलिसांना माहिती दिली. पंचनामा करून रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नक्षत्रवाडी, कांचनवाडी, लिंक रोड, गोलवाडी, पाटोदा रस्ता तसेच धुळे–सोलापूर महामार्ग परिसरात मागील दोन महिन्यांत लुटमारीच्या पाच आणि घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत. मात्र अद्याप एकाही गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. आठ सदस्यांच्या गिरीकुंज सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचे स्पष्ट होत आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांनी अधिक गस्त आणि कडक पोलिस कारवाईची मागणी केली आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,426 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क