छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असून युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. २६) भव्य मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील क्रांती चौक ते गुलमंडी दरम्यान सायंकाळी ही मशाल रॅली काढली जाणार असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ याच रॅलीद्वारे होणार आहे.

मशाल रॅलीपूर्वी आदित्य ठाकरे हे राजा बाजार येथील ऐतिहासिक संस्थान गणपती मंदिरात दर्शन घेणार असून त्यांच्या हस्ते नारळ फोडून महापालिका निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. धार्मिक विधी आणि शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात करण्याचा शिवसेना उबाठाचा हा प्रयत्न राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.

या मशाल रॅलीस शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना उपनेते सुभाष पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच शहर व जिल्ह्यातील शिवसेना उबाठाचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, युवासैनिक आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

शहरातील एकूण २९ प्रभागांमध्ये स्वतंत्रपणे मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक प्रभागातून मशाल घेऊन पदाधिकारी व इच्छुक उमेदवार क्रांती चौकात एकत्र येणार आहेत. एकूण ६१ मशालींसह मुख्य मशाल रॅलीत सहभागी होऊन क्रांती चौक ते गुलमंडी हा मार्ग कापण्यात येणार आहे. या रॅलीद्वारे शिवसेना उबाठाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि निवडणुकीसाठीची तयारी नागरिकांसमोर मांडली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीत शिवसेना उबाठा पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे संकेत या मशाल रॅलीतून देण्यात येणार असून, शहराच्या राजकारणात या रॅलीकडे विशेष लक्ष लागले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/GlraBleBDXk4TRi1fKkvIy

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

684 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क