छत्रपती संभाजीनगर : ऑनलाइन रम्मीच्या खेळात गमावलेली रक्कम भरून काढण्यासाठी एका ट्रकचालकाने स्वतःच्याच कामाच्या क्षेत्रातील गॅस सिलिंडर चोरीचा धक्कादायक कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारेगाव येथील एचपीसीएल गॅस कंपनीच्या परिसरातून भरलेला ट्रक चोरून नेणाऱ्या मुख्य सूत्रधारासह तिघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपीने चोरलेले ५० गॅस सिलिंडर अवघ्या दोन हजार रुपयांत एका एजन्सी चालकाला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

विजय ऊर्फ गुड्डू विश्राम पवार (वय ३८, रा. नारेगाव) असे मुख्य आरोपी ट्रकचालकाचे नाव असून, जगदीश ऊर्फ जिगर राजेंद्र पटेल (वय ३८, रा. घोडेगाव, ता. नेवासा) आणि अक्षय गणेश सोळुंके (वय २७, रा. मूर्तिजापूर) अशी अटक केलेल्या अन्य दोन आरोपींची नावे आहेत. २३ डिसेंबरच्या रात्री एचपीसीएल गॅस कंपनीच्या आवारात ट्रक (एमएच ४४ यू २३०९) उभा करण्यात आला होता. चालक सुंदर मुंडे याने नेहमीप्रमाणे ट्रकची चावी गाडीतच ठेवली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी रात्री ६२ गॅस सिलिंडरांसह ट्रक पळवून नेला.

यानंतर सिलिंडर उतरवून ट्रक झाल्टा फाट्याजवळ सोडून देण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की विजय पवार यानेच ही चोरी केली आहे. पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रवीण वाघ, योगेश नवसारे आणि विजय निकम यांच्या पथकाने कारवाई करत तिघांना अटक केली.

तपासात विजय पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याला ऑनलाइन रम्मीचे व्यसन असल्याचे उघड झाले. रम्मीत लाखो रुपये गमावल्यानंतर ही तूट भरून काढण्यासाठी त्याने चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने चोरलेले ५० सिलिंडर जगदीश पटेलला, तर १० सिलिंडर अक्षय सोळुंके याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी घोडेगाव (जि. अहिल्यानगर) आणि मूर्तिजापूर (छत्रपती संभाजीनगर) येथे छापे टाकून एकूण ६० गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,018 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क