छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी येत्या १५ जानेवारी रोजी शहरात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील बहुतांश शाळांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचा थेट परिणाम शालेय कामकाजावर होणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्र असलेल्या शाळांना १४ आणि १५ जानेवारी रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

महापालिकेच्या मालकीच्या शाळांबरोबरच खासगी अनुदानित तसेच विनाअनुदानित शाळांच्या इमारतीही मतदान केंद्रासाठी वापरण्यात येणार आहेत. मतदान प्रक्रियेपूर्वी आवश्यक असलेली तयारी लक्षात घेता, निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानाच्या आधीच्या दिवशीच संबंधित मतदान केंद्रांवर उपस्थित राहावे लागते. यावेळी ईव्हीएम मशिन्स, मतपेट्या, मतदार यादी, फर्निचर, खुर्च्या, टेबल्स तसेच इतर आवश्यक साहित्याची मांडणी करावी लागते. याशिवाय मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिव्यांगांसाठी सुविधा, रांगा उभ्या राहण्यासाठी आवश्यक व्यवस्था प्रशासनाकडून केली जाते.

ही सर्व तयारी करण्यासाठी किमान एक पूर्ण दिवस लागतो. त्यामुळे मतदान केंद्र असलेल्या शाळांच्या इमारती महापालिका निवडणूक प्रशासन १४ जानेवारी रोजीच ताब्यात घेणार आहे. परिणामी या शाळांमध्ये १४ आणि १५ जानेवारी रोजी शैक्षणिक कामकाज बंद राहणार आहे.

याशिवाय काही शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी असल्याने अशा शाळांनाही दोन दिवसांची सुटी देण्यात आली आहे. तर ज्या शाळांमध्ये मतदान केंद्र नाही, मात्र काही शिक्षक निवडणूक कामात सहभागी आहेत, त्या शाळांना किमान मतदानाच्या दिवशी म्हणजेच १५ जानेवारी रोजी सुटी देण्यात येणार आहे.

निवडणूक प्रक्रियेचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने ही व्यवस्था केली असून, पालक व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/Kj1Sby1ZThs6fOYPl7g8RY

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

617 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क