छत्रपती संभाजीनगर : मुलगा नपुंसक असल्याची पूर्वकल्पना असतानाही कुटुंबीयांनी त्याचा विवाह लावून दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, विवाहानंतर नाशिक येथे फ्लॅट खरेदीसाठी १५ लाख रुपयांची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार मे २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील अंदरसूल परिसरात घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शहरात राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात पती, सासू, जाऊ, दीर, नणंद यांच्यासह एकूण दहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी महिलेचा विवाह मे २०२५ मध्ये झाला होता. विवाहानंतर पतीने ‘नवस केला आहे’ असे कारण देत शारीरिक संबंध टाळण्यास सुरुवात केली. सुमारे महिनाभरानंतरही परिस्थिती न बदलल्याने तिने डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली असता, पतीने तिच्याशी मारहाण करून मानसिक छळ सुरू केल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, सासरच्या मंडळींना सर्व प्रकार माहिती असतानाही त्यांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर नाशिकमध्ये फ्लॅट घेण्यासाठी १५ लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आला. या दरम्यान तिचे सोन्याचे दागिने तसेच शैक्षणिक कागदपत्रे जबरदस्तीने काढून घेण्यात आली.

नातेवाइकांच्या मध्यस्थीने पाच लाख रुपये देत पतीच्या वैद्यकीय उपचारांचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही छळ थांबला नाही. सप्टेंबर २०२५ मध्ये पतीकडून पुन्हा जोरदार मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, पतीचे त्याच्या मित्रासोबत समलैंगिक संबंध असल्याचाही आरोप पीडितेने केला आहे.

या प्रकरणाचा तपास सहायक फौजदार अहमद सय्यद करीत असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/F4uD1Fqnz3sBgCKFsrOSDq

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,516 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क