छत्रपती संभाजीनगर :  शासकीय योजनेंतर्गत घेतलेल्या व्यावसायिक कर्जाच्या थकित हप्त्यांवरील कारवाई थांबवून मुदतवाढ मिळवून देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारणाऱ्या खासगी लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. सागर कारभारी जाधव (वय ३२, रा. वैजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. त्याच्यावर रात्री रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार ३५ वर्षीय तरुणाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत देवगिरी बँकेतून व्यवसायासाठी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, काही कारणांमुळे कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेने त्याच्यावर कारवाईची नोटीस बजावली. ही कारवाई पुढे उपनिबंधक कार्यालयामार्फत होणार असल्याचे समजताच आरोपी जाधवने हस्तक्षेप करण्याचे आमिष दाखवत कारवाई टाळण्यासाठी व हप्त्यांना मुदतवाढ मिळवून देण्यासाठी १२ हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी दोन हजार रुपये त्याने आधीच ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले होते.

उर्वरित रकमेच्या सततच्या तगाद्यामुळे त्रस्त झालेल्या तरुणाने एसीबी अधीक्षक माधुरी कांगणे यांच्याकडे तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे यांच्या प्राथमिक चौकशीत जाधव लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचून बुधवारी रेल्वेस्थानकावर कारवाई केली. आरोपी पत्नीसमवेत रेल्वेत बसलेला असताना तक्रारदाराकडून दहा हजार रुपये स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.

विशेष म्हणजे जाधव मराठवाडा अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह असोसिएशनमध्ये स्वतःला लिपिक म्हणून मिरवत होता, मात्र त्याची तेथे कोणतीही अधिकृत नियुक्ती नसल्याचे तपासात उघड झाले आहे. केवळ अर्ज केलेला असतानाही तो स्वतंत्र टेबल लावून उपनिबंधकांच्या नावाने लोकांची कामे करून देण्याचे आश्वासन देत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे शासकीय कार्यालयांभोवती सुरू असलेल्या दलालीच्या साखळीवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/LC9pzB4lHXXKDuIr4cUPAq?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,004 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क