छत्रपती संभाजीनगर  : शहरातील सातारा परिसरात घरातूनच बेकायदेशीर गर्भपात सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. साईनगर भागातील एका घरावर महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत रविवारी (दि. ५) छापा टाकला. या कारवाईत दोन महिलांना प्रत्यक्ष गर्भपात करताना रंगेहाथ पकडण्यात आले असून, या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, जिल्हा परिषद केंद्रीय शाळेसमोरील छाया बाबासाहेब जाधव (५५) यांच्या घरात हे अवैध केंद्र सुरू होते. त्यांची मुलगी वर्षा जाधव (३०) आणि ऊर्मिला गायकवाड (३२) या दोघी बहिणी मिळून हे केंद्र चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. एका अज्ञात डॉक्टरच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याचे समोर आले असून, संबंधित डॉक्टरचा शोध अद्याप लागलेला नाही.

या प्रकरणाची माहिती मिळताच सातारा पोलिसांनी मनपाच्या आरोग्य विभागाशी समन्वय साधून संयुक्त पथक तयार केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. अमर ज्योती शिंदे, डॉ. सुनील पाटील, विधी सल्लागार रश्मी शिंदे तसेच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तपासादरम्यान, पोर्टेबल मशीनद्वारे गर्भलिंग तपासणी करून मुलगी असल्यास गर्भपात केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची संमती घेऊन औषधे व इंजेक्शनच्या सहाय्याने प्रक्रिया पूर्ण केली जात होती.

दरम्यान, या प्रकरणातील रुग्णाचा पती रामदास घोडे (३३) याला पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य सूत्रधार म्हणून जीएनएम शिक्षण घेतलेली नर्स ज्योती पवार (३०) हिचा सहभाग समोर आला असून, ती सध्या फरार आहे. पोलिसांकडून तिचा शोध सुरू असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KuJrJlfinbj4dlldQCNIAb?mode=gi_t

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,153 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क