सासरच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्या मुलींसह रेल्वे पटरीवर आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रयत्न केला. मंगळवारी (दि. २०) दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेत सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे महिलेचे आणि मुलींचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

घटनास्थळी उस्मानपुरा पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि पुढील कार्यवाही सुरू केली. महिलेने आत्महत्येपूर्वी तीन पानांची सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात तिचे निखील (नाव काल्पनिक) याच्यासोबतचे २०२० पासूनचे प्रेमसंबंध आणि लिव्ह इन रिलेशनशिपचे वर्णन होते.

महिलेने सांगितले की, निखीलच्या कुटुंबाने तिच्या पहिल्या गर्भावस्थेतच तिला गर्भपात करण्यासाठी प्रचंड त्रास दिला, आणि तिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेतला. निखीलच्या पोलिस अधिकाऱ्याच्या भावाने देखील या त्रासात सहभाग घेतल्याचे आरोप आहेत. अखेर, या सततच्या छळामुळे तिने आपल्या दोन मुलींसह आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये “जिवंतपणी न्याय मिळाला नाही, मयत झाल्यावर तरी द्या” अशी आर्त हाक दिली आहे. यापूर्वी देखील तिने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र वेळेवर तिला वाचवण्यात आले होते.

पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी  खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/BkL2FgwQUTO5Drq9ffF9RJ

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

1,583 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क