छत्रपती संभाजीनगर : शहरातील गोगाबाबा टेकडी परिसरात एका तरुणीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रेणुका शांताराम गांगुर्डे असे मृत तरुणीचे नाव असून त्या एस. बी. महाविद्यालयात सहशिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय त्या पोलीस भरतीची तयारीही करत असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच बेगमपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, रेणुका गांगुर्डे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास करण्यात येत असून, संबंधित बाबींची पडताळणी केली जात आहे. बेगमपुरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/IvoLcj6rZSSF1R9c7f0Ijh?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

3,299 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क