वाळूज महानगरातील आषाढी एकादशी यात्रेदरम्यान कडेकोट पोलिस बंदोबस्त आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असतानाही चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांना लक्ष्य केले. यात्रेत तब्बल ३० महिलांची मंगळसूत्रे चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा, दामिनी पथक आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १४ संशयितांना ताब्यात घेतले आहे.

यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. एआय तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोनद्वारे हवाई पाहणी तसेच अत्याधुनिक नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून संपूर्ण यात्रेवर लक्ष ठेवण्यात येत होते. याशिवाय सुमारे दीड हजार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात होते. मात्र, एवढी मोठी यंत्रणा असतानाही गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे लंपास केली.

मंगळसूत्र चोरीच्या घटनांनंतर महिलांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयावरून प्रिया बाबासाहेब काळे, संध्या परसराम भोसले, भारती भास्कर भोसले, रवीना अंबर चव्हाण यांच्यासह एकूण १४ संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/C3CCRbqDXDA2dKhWRQo4YD?s=cl&p=a&ilr=2

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

595 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क