छत्रपती संभाजीनगर : गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे बाळगून त्यांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई ७ ऑगस्ट रोजी दुपारी २.५० वाजता सईदा कॉलनी, जटवाडा रोडवरील आनंद क्लिनिकजवळ करण्यात आली. या कारवाईत एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, दुचाकी आणि पाच मोबाइल फोन असा एकूण सुमारे १ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख शकील शेख नाजिम (१९, रा. सईदा कॉलनी, जटवाडा रोड), सय्यद अल्फाज सय्यद अहमद (२१, रा. आलमगीर कॉलनी, जटवाडा रोड), शेख अबू नासेर शेख रशीद (२७, रा. सईदा कॉलनी) आणि उमर दुर्राणी जिया दुर्राणी (२५, रा. गल्ली नं. १, पिल्ली कॉलनी, चंपाचौक) यांचा समावेश आहे.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अर्जुन कदम व त्यांच्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत जटवाडा रोड परिसरात दोन इसम पिस्तूल विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शकील आणि अल्फाज यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

चौकशीदरम्यान शकील याने हे पिस्तूल व काडतुसे शेख अबू नासेर आणि उमर दुर्राणी यांनी विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केली. तपासात चौघांचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त शशिकांत मानत, सहायक पोलीस आयुक्त मच्छर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम व गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

443 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क