छत्रपती संभाजीनगर : औरंगपुरा परिसरात क्लासला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा सातत्याने पाठलाग करून तिची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुलीला अश्लील इशारे करण्यासह तिच्याकडून मोबाइल नंबर आणि इन्स्टाग्राम आयडी मागणाऱ्या तरुणाने मुलीच्या वडिलांनाही चाकूने मारून टाकण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संदेश अनिल म्हस्के (रा. किलेअर्क) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयीन प्रक्रियेनंतर हसूल कारागृहात पाठविले आहे.

पीडित मुलगी औरंगपुऱ्यातील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये क्लाससाठी जाते. शुक्रवारी (दि. ७) सायंकाळी सुमारे ७ वाजता क्लास सुटल्यानंतर ती बाहेर आली असता संदेश तेथे उभा राहून तिच्याकडे पाहत होता. त्याचवेळी मुलीचे वडील तिला घेण्यासाठी आले. मुलीने संबंधित तरुण आपल्याकडे पाहत असल्याचे वडिलांना सांगितले. त्यानंतर वडिलांनी संदेशला हटकून जाब विचारला असता, त्याने ‘तुला चाकूने मारून टाकीन’, अशी धमकी देत तेथून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

यानंतर वडिलांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपी मागील काही दिवसांपासून तिचा पाठलाग करीत असल्याचे तिने सांगितले. आठवडाभरापूर्वी क्लास सुटल्यानंतर आरोपीने तिच्यासमोर येऊन ‘तू मला खूप आवडतेस, मला तुझ्यासोबत बोलायचे आहे’, असे म्हणत इन्स्टाग्राम आयडी मागितला होता. तसेच जुलै महिन्यात पायी घरी जात असताना त्याने तिचा पाठलाग करून मोबाइल नंबर मागितला होता.

मुलीने पाठलाग करू नकोस, मला भीती वाटते, मी वडिलांना सांगणार असल्याचे सांगितल्यानंतरही आरोपीने ‘मी कोणाला घाबरत नाही’, असे म्हणत दमदाटी केली. तो नेहमी क्लासबाहेर उभा राहून अश्लील इशारे करीत असल्याचेही मुलीने सांगितले. मात्र भीतीपोटी तिने याबाबत आधी कोणालाही माहिती दिली नव्हती.

या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक अशफाक शेख करीत आहेत.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/KYaIrqX6xIM3SpZ1FYjFWw?s=cl&p=a&ilr=0

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

454 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क