छत्रपती संभाजीनगर : घरात रंगकाम सुरू असताना संधी साधून तब्बल ८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना शहरातील समर्थनगर परिसरात घडली आहे. ‘सागर रेसिडेन्सी’ या इमारतीतील घरातून राणी हार, मंगळसूत्र आणि बांगड्या असा ऐवज गायब झाला. या प्रकरणी रंगकामासाठी आलेल्या दोन कामगारांवर संशय व्यक्त करण्यात आला असून क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समर्थनगर येथील सागर रेसिडेन्सीमध्ये मनीष क्याडल हे कुटुंबासह राहतात. ८ सप्टेंबर रोजी त्यांच्या घरी रंगकामाचे काम सुरू होते. यासाठी दोन कामगार आले होते. घरातील बेडरूममध्ये रंगकाम सुरू असताना क्याडल यांच्या पत्नीची पर्स बेडवर ठेवण्यात आली होती.

रंगकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कामगार घरातून निघून गेले. त्यानंतर पर्सची पाहणी केली असता त्यातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. घरात तसेच परिसरात दागिन्यांचा शोध घेण्यात आला; मात्र ते सापडले नाहीत.

पर्समध्ये सोन्याचा राणी हार, मंगळसूत्र आणि बांगड्या असे एकूण ८ तोळे वजनाचे दागिने होते. रंगकामाच्या वेळी घरात आलेल्या दोन कामगारांवर कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. शेख हुसेन शेख खाजा आणि अजमद खान रफिक खान अशी संशयित कामगारांची नावे आहेत.

दागिने चोरीला गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मनीष क्याडल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवला असून दोन्ही संशयित कामगारांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

________________________

*”द छत्रपती संभाजीनगर न्यूज “च्या व्हाट्सएप ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा….*

https://chat.whatsapp.com/EOeAE4QPeWR14rmQMaPbCz?s=cl&p=a&mlu=4&ilr=4

*जाहिरातीसाठी_संपर्क करा 8329014805*

271 Views

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क