Tag: #ChhatrapatiSambhajinagar

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा विजय; सतीश चव्हाण यांचा १८ हजार १२४ मतांनी पराभव, पहाटे निकाल जाहीर

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी विजयाचा गुलाल उधळला. गुरुवारी पहाटे जाहीर झालेल्या निकालात त्यांनी सतीश चव्हाण यांच्यावर १८ हजार १२४ मतांनी मात…

छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रामाणिकपणाचा आदर्श; हॉटेलमध्ये विसरलेले लाखोंचे सोन्याचे दागिने अन् रोकड मालकाने पोलिसांकडे केली जमा, महिलेचा ऐवज सुखरूप परत

छत्रपती संभाजीनगर : नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये आलेल्या महिलेचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेले पाकीट विसरून राहिले. मात्र, हॉटेल मालकाने या मौल्यवान ऐवजावर स्वतःचा हक्क न सांगता तो पोलिसांकडे जमा…

कोजागरीचा जल्लोष! संभाजीनगरकरांनी रिचविले साडेतीन ते चार लाख लिटर दूध

छत्रपती संभाजीनगर : चांदण्यांची शीतलता, हातात मसालेदार दुधाचा ग्लास आणि मित्रमंडळींसोबत गप्पांची रंगत… अशा उत्साही वातावरणात छत्रपती संभाजीनगरकरांनी कोजागरी पौर्णिमेचा आनंद लुटला. रविवारी, २५ तारखेला शहरात कोजागरीनिमित्त साडेतीन ते चार…

आयपीओमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष; मुकुंदवाडीतील नागरिकाला ४८ लाखांचा गंडा

छत्रपती संभाजीनगर : शेअर बाजारात मोठा नफा मिळवण्याच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक एका नागरिकाला महागात पडली. आयपीओमध्ये पैसे गुंतवून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत मुकुंदवाडीतील ३७ वर्षीय नागरिकाची ४८ लाख…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर निवडणुकीची तयारी; ७१ टेबलांवर ४,४५५ कर्मचारी मंगळवारी मतांची मोजणी करणार

छत्रपती संभाजीनगर : विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील मतमोजणी प्रक्रिया मंगळवारी चिकलठाणा येथील एमआयडीसी परिसरातील ‘बुडस्टार्म…

पोलिस असल्याची बतावणी करून व्यावसायिकाला गंडा; सोन्याची चेन आणि अंगठीसह लाखोंचा ऐवज लंपास

वाळूज महानगर : गुन्हे शाखेचे पोलिस असल्याची बतावणी करून तिघांनी एका व्यावसायिकाला गंडा घातल्याची घटना ए. एस क्लब रोडवर घडली आहे. तपासणीच्या बहाण्याने व्यावसायिकाकडील सोन्याची चेन आणि अंगठी काढून घेत…

संभाजीनगरच्या ओल्या कचऱ्यापासून तयार होणार गॅस; बीपीसीएलचा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या समस्येतून ऊर्जा निर्मितीचा मार्ग शोधला जात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत ओल्या कचऱ्यापासून गॅस तयार करण्यासाठी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) कंपनीने प्रकल्प…

छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारांचा निरुत्साह; मराठवाड्यात सर्वात कमी 55.73% मतदान, 27 ऑक्टोबरच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे. काल शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये मतदान…

संभाजीनगरच्या उपमहापौरांना जीवे मारण्याची धमकी; ‘पाच लाखांची सुपारी घेतलीय’, १० लाखांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील राजकीय वर्तुळात सध्या एका धमकीच्या फोनची चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना जीवे मारण्याची धमकी देत पैशांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस…

दिवाळीपूर्वी संभाजीनगरच्या ३ लाख कामगारांना मिळणार बोनस; ७५० कोटींची उलाढाल अपेक्षित

छत्रपती संभाजीनगर : दिवाळीचा सण जवळ आला की खरेदीची लगबग सुरू होते. यंदा छत्रपती संभाजीनगरच्या बाजारपेठेला औद्योगिक कामगारांच्या बोनसचा मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये काम करणाऱ्या तीन…

error: Content is protected !!
Open chat
Hello 👋
जाहिरातीसाठी संपर्क